
बीड, 19 जुलै (हिं.स.)। भोगलवाडी-काळाचीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रामदास रामचंद्र तिडके यांची शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे ग्रामपंचायत परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच युवकांच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis