बीड - सेवानिवृत्त प्राध्यापकाचे घर फोडले; साडेपाच लाखाचा ऐवज लंपास
बीड, 19 जुलै, (हिं.स.)। देवदर्शनाला गेलेल्या सेवानिवृत्त प्राध्यापकाचे घरी कोणी नसल्याचा फायदा घेत भर दुपारी घरफोडी करीत साडे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक
चोरी


बीड, 19 जुलै, (हिं.स.)। देवदर्शनाला गेलेल्या सेवानिवृत्त प्राध्यापकाचे घरी कोणी नसल्याचा फायदा घेत भर दुपारी घरफोडी करीत साडे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथे घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील गोरे वस्तीवरील सेवानिवृत्त प्रा. बाळासाहेब दशरथ गोरे हे कुटुंबीयांसह सकाळी देवदर्शनासाठी बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत तीन अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील दोन तोळे सोन्याचे दागिने, २० हजार रुपयांची रोकड तसेच भूगर्भातील पाणी तपासणीसाठी वापरण्यात येणारे जर्मनी टेक्नॉलॉजीचे सुमारे २ लाख ८० हजार रुपये किमतीचे यंत्र असा लाखोंचा ऐवज लांबविला. चोरी केल्यानंतर तिन्ही चोरटे दुचाकीवरून पसार झाले. दरम्यान घरफोडी करतानाचा एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याने लाल रंगाचा शर्ट परिधान केला असल्याचे दिसून आले आहे. चोरीनंतर हे तिघे नगर-बीड रोडवरील शेरी फाट्यावरून मि रजगावच्या दिशेने जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande