प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करण्यासह एसआयआर च्या कामाला गती द्यावी - अधिकारी एस. चोकलिंगम
नाशिक, 19 जुलै (हिं.स.)। मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाचे काम अधिक गतिमान, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावे. प्रत्येक पात्र मतदाराची नोंद सुनिश्चित करण्यासाठी घराघरांत पोहोचून गणनापत्रके भरून घ्यावीत, स्वयं-नोंदणी प्रक्रियेल
Speed up the work of SIR,


नाशिक, 19 जुलै (हिं.स.)। मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाचे काम अधिक गतिमान, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावे. प्रत्येक पात्र मतदाराची नोंद सुनिश्चित करण्यासाठी घराघरांत पोहोचून गणनापत्रके भरून घ्यावीत, स्वयं-नोंदणी प्रक्रियेला चालना द्यावी तसेच नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी तथा महाराष्ट्र राज्याचे अपर मुख्य सचिव एस. चोकलिंगम यांनी दिल्या.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोकलिंगम यांनी आज नाशिक शहरातील विविध विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांना भेट देऊन मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतदान केंद्रांवरील सुविधा, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचे कामकाज, गणनापत्रक भरण्याची प्रक्रिया, स्वयं-नोंदणी (सेल्फ एन्युमरेशन) उपक्रम तसेच ईएफ (Enumeration Form) संगणकीकरणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोकलिंगम यांनी मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात वेग, अचूकता आणि पारदर्शकता या तीन बाबींना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. तसेच स्वयं-नोंदणी प्रक्रियेला अधिक चालना देण्यासाठी व्यापक जनजागृती करावी आणि सर्व पात्र नागरिकांनी गणनापत्रक भरून मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आढे, सहाय्यक जिल्हाधिकारी कश्मीरा संखे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई, १२३-नाशिक पूर्व मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी कुंदन हिरे, १२४-नाशिक मध्य मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी अर्पिता ठुबे, १२५-नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी शुभांगी भारदे, १२६-नाशिकरोड-देवळाली (अ.जा.) मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी शर्मिला भोसले तसेच तहसीलदार राजेंद्र वाकचौरे,अपर तहसीलदार अमोल निकम, तहसीलदार आबासाहेब तांबे, आणि तहसीलदार पंकज पवार उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande