धर्मपुरीत पालखी आगमनाने भक्तीचा उत्सव; फुलांची उधळण, टाळ-मृदंगाने दुमदुमला परिसर
सोलापूर, 19 जुलै (हिं.स.)। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी (ता. माळशिरस) येथे अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले. लाखो वार
grdf


grdf


सोलापूर, 19 जुलै (हिं.स.)। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी (ता. माळशिरस) येथे अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या स्वागत सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

विठ्ठल... विठ्ठल... आणि माऊली... माऊली... या अखंड नामघोषाने धर्मपुरी दुमदुमून गेली. टाळ-मृदंगाचा गजर, अभंगांचा मधुर निनाद, भगव्या पताकांची उधळण आणि भक्तिभावाने नाचणारे वारकरी यामुळे वातावरणात भक्तीची अवर्णनीय अनुभूती निर्माण झाली.

पालखी आगमनावेळी रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भाविकांनी फुलांची उधळण करत माऊलींचे मनोभावे स्वागत केले. विविध सामाजिक संस्था, मंडळे आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, अल्पोपहार, आरोग्य सेवा तसेच इतर आवश्यक सुविधांची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. स्वागत कमानी, आकर्षक रांगोळ्या आणि देखण्या सजावटीमुळे परिसराला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले.

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा केवळ धार्मिक परंपरा नसून श्रद्धा, सेवा, समता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा लोकोत्सव असल्याचे या सोहळ्यात पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

या स्वागत सोहळ्यास माजी आमदार राम सातपुते, सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मराठी चित्रपट अभिनेते भाऊ कदम, सोलापूर जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande