ठाणे - सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी (श.प.) रस्त्यावर
ठाणे, 19 जुलै (हिं.स.)। नीट परीक्षेतील गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय झाले आहे. या नीट पेपरफुटीला जबाबदार असलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी गेले 20 दिवस उपोषणाला बसलेले ज्येष्
ठाणे


ठाणे, 19 जुलै (हिं.स.)। नीट परीक्षेतील गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय झाले आहे. या नीट पेपरफुटीला जबाबदार असलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी गेले 20 दिवस उपोषणाला बसलेले ज्येष्ठ कार्यकर्ते सोनम वांगचूक हे उपोषणाला बसले आहेत. मात्र, सरकारने हे आंदोलन चिरडून काढण्याचा चंग बांधला आहे. या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली.

सोनम वांगचूक यांचे उपोषण संपविण्यासाठी केंद्र सरकारने न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करीत त्यांना जबरदस्तीने रूग्णालयात दाखल केले आहे. वांगचूक यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे. याच ठिकाणी दीपक दीपके यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याचा निषेध करण्यासाठी मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्र्यातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

याप्रसंगी सोनम मानचुक मागील २० दिवसांपासून नीट (NEET) आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या पेपर फुटीच्या विरोधात शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने उपोषण करत आहेत. ​सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी, त्यांना जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये हलवून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, जो अत्यंत चुकीचा आणि असंवैधानिक आहे. ​आज तरुणांनी एकत्रित येऊन सरकारला हे दाखवून दिले आहे की, तरुणांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे आणि अशा अन्यायाविरोधात तरुण नक्कीच आवाज उठवतील.

​देशाच्या शिक्षण पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे आणि सरकारला हे मान्य करावे लागेल की सध्याची शिक्षण व्यवस्था अपयशी ठरत आहे. ​सोनम मानचुक यांच्यावर झालेला हा हल्ला निषेधार्ह आहे. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर अशा प्रकारे बळाचा वापर करणे लोकशाहीत मान्य नाही, असे मर्जिया पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande