परभणी - जि. मध्यवर्ती बँकेत आठ जागांकरिता 95.23 टक्के मतदान
परभणी, 19 जुलै (हिं.स.)। परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या आठ जागांकरिता आज रविवार रोजी 95.23% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या बँकेच्या एकूण 1508 मतदारांपैकी 1436 मतदारांनी मतदानाच्या या टप्प्यात सहभाग नोंदविला. परभणी व हिंग
जिल्हा मध्यवर्ती बँकेत आठ जागांकरिता 95.23 टक्के मतदान : उद्या मतमोजणी : आठ जागांचा निकाल जाहीर होणार


परभणी, 19 जुलै (हिं.स.)। परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या आठ जागांकरिता आज रविवार रोजी 95.23% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

या बँकेच्या एकूण 1508 मतदारांपैकी 1436 मतदारांनी मतदानाच्या या टप्प्यात सहभाग नोंदविला. परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यातील ज्येष्ठ मातब्बर नेतेमंडळीसह,अन्य आजी-माजी खासदार, आमदार तसेच ज्येष्ठ संचालकांनी त्यांच्या कुटुंबीयांनी मतदानाच्या टप्प्यात सहभाग नोंदविला. दरम्यान

परभणी जिल्ह्यातील मानवत व पूर्णा,हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, या पाच सोसायटी मतदारसंघासह अन्य तीन जागांकरिता या निवडणुकीचा मतदानाचा टप्पा आज होता. दरम्यान या आठ जागांचा निकाल सोमवारी जाज्ञहीर होणार आहे त्यामुळे या निवडणुकीकडे परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यातील नेते मुलींचे पूर्णतः लक्ष केंद्रित झाले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande