रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर ११ सदस्यांची निवड
रत्नागिरी, 20 जुलै (हिं.स.) । रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित म्हणून एकूण ११ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय आज प्रसिद्ध केला आहे. या निर्ण
रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर ११ सदस्यांची निवड


रत्नागिरी, 20 जुलै (हिं.स.) । रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित म्हणून एकूण ११ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय आज प्रसिद्ध केला आहे.

या निर्णयानुसार विधानमंडळ/संसद सदस्यांमधून २ नामनिर्देशित सदस्य आणि जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले ९ विशेष निमंत्रित सदस्य अशा एकूण ११ जणांना समितीवर संधी देण्यात आली आहे.

नियुक्त सदस्यांची यादी अशी - आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, विशेष निमंत्रित सदस्य - संतोष लक्ष्मण जैतापकर (नरवण, ता. गुहागर), सचिन मनरंजन जाधव (दापोली), प्रसाद प्रभाकर सावंत (मारळ, ता. संगमेश्वर), विलास (बंधू) रामचंद्र वारिसे (गोळप, ता. जि. रत्नागिरी), संदेश (बापू) मनोहर शेट्ये (साखरपा, ता. संगमेश्वर), अमित गजानन केतकर (कोंडगाव, साखरपा, ता. संगमेश्वर), केदार भिकाजी साठे (जालगाव, ता. दापोली), अजय शांताराम बिरवटकर (पोयनार अलाटीवाडी, ता. खेड), सचिन श्रीकांत वहाळकर (रत्नागिरी)

नवनियुक्त सदस्यांचा कार्यकाळ हा राज्य शासनाकडून हे नामनिर्देशन रद्द होईपर्यंत किंवा सध्याच्या मंत्रिमंडळाच्या पदावधीपर्यंत, यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत अबाधित राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande