लोकसहभागातून सक्षम आरोग्य व्यवस्था – एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची प्रभावी सुरुवात!
लातूर, 20 जुलै (हिं.स.)। लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, उत्तरदायी आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभाग आणि राज्य शासनाने “एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती” स्थापन करण्याचा दूरदृष्टीपूर्ण आणि क्रांतिकारक निर्णय घेतला. या उपक्रमामुळ
आरोग्यवर्धिनी समिती


लातूर, 20 जुलै (हिं.स.)।

लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, उत्तरदायी आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभाग आणि राज्य शासनाने “एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती” स्थापन करण्याचा दूरदृष्टीपूर्ण आणि क्रांतिकारक निर्णय घेतला. या उपक्रमामुळे आरोग्य संस्था, स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण होऊन शासनाच्या विविध आरोग्य उपक्रमांना अधिक गती मिळणार आहे.

तहसील कार्यालय, अहमदपूर येथे आज मतदारसंघातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयोजित बैठकीत ग्राम आरोग्य, पोषण व स्वच्छता समिती (VHNSC) तसेच विविध आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत समित्यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम, उपलब्ध सुविधा, नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि भविष्यातील नियोजन यावर सखोल चर्चा करण्यात आली.

सर्वसामान्य नागरिकांना वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, मातृ-शिशू आरोग्य, पोषण, लसीकरण, स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांचा अधिक व्यापक लाभ प्रत्येक गावापर्यंत पोहोचावा, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश देण्यात आले.

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी श्रीमती मंजुषाताई लटपटे, तहसीलदार श्रीमती उज्वलाताई पांगारकर, तहसीलदार नरसिंग जाधव, लातूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंदराव सुरवसे, समाज कल्याण सभापती उत्तमराव माने आदी मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande