सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात किरकोळ घसरण
नवी दिल्ली, 20 जुलै (हिं.स.)। देशांतर्गत सराफा बाजारात सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात सोने आणि चांदीच्या दरात किरकोळ घसरण दिसून आली. दरात झालेल्या या सौम्य घसरणीमुळे देशातील बहुतांश सराफा बाजारांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ४३ हज
Bullion Market Gold Silver


नवी दिल्ली, 20 जुलै (हिं.स.)। देशांतर्गत सराफा बाजारात सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात सोने आणि चांदीच्या दरात किरकोळ घसरण दिसून आली. दरात झालेल्या या सौम्य घसरणीमुळे देशातील बहुतांश सराफा बाजारांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ४३ हजार २८० रुपयांपासून १ लाख ४३ हजार ४३० रुपयांपर्यंत नोंदवला गेला. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ३१ हजार २९० रुपयांपासून १ लाख ३१ हजार ४४० रुपयांदरम्यान राहिला. चांदीच्या दरातही सांकेतिक घसरण झाल्याने दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर प्रति किलो २ लाख २९ हजार ९०० रुपयांवर व्यवहार करताना दिसून आला.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ४३ हजार ४३० रुपये असून २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३१ हजार ४४० रुपये नोंदवण्यात आला. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १ लाख ४३ हजार २८० रुपये, तर २२ कॅरेट सोने १ लाख ३१ हजार २९० रुपयांवर विकले जात आहे. अहमदाबादमध्ये २४ कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत प्रति १० ग्रॅम १ लाख ४३ हजार ३३० रुपये असून २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३१ हजार ३४० रुपये आहे.

चेन्नई आणि कोलकाता या दोन्ही शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ४३ हजार २८० रुपये असून २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३१ हजार २९० रुपये आहे. भोपाळमध्ये २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १ लाख ४३ हजार ३३० रुपयांवर, तर २२ कॅरेट सोने १ लाख ३१ हजार ३४० रुपयांवर व्यवहार करत आहे.

जयपूर आणि लखनऊ या शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ४३ हजार ४३० रुपये असून २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३१ हजार ४४० रुपये आहे. पटना येथे २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १ लाख ४३ हजार ३३० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत १ लाख ३१ हजार ३४० रुपये नोंदवली गेली.

देशातील इतर भागांप्रमाणेच कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशा राज्यांतील सराफा बाजारातही सोन्याच्या दरात सौम्य कमजोरी दिसून आली. या राज्यांच्या राजधानी असलेल्या बेंगळुरू, हैदराबाद आणि भुवनेश्वर येथे २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ४३ हजार २८० रुपये असून २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३१ हजार २९० रुपये आहे. जागतिक बाजारातील हालचाली आणि स्थानिक मागणी-पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर सराफा बाजारात सध्या सावध व्यवहार सुरू असून, आगामी दिवसांत सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उतारांकडे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande