सोलापुरात मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे 56 जनहित उपक्रम
सोलापूर, 20 जुलै (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने 56 विविध सामाजिक आणि जनहिताचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
cm

यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर विविध सेवा, सामाजिक आणि जनसंपर्क उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये नागरिकांच्या सहभागावर भर दिला जाणार असल्याचे तडवळकर यांनी सांगितले. या उपक्रमांद्वारे समाजोपयोगी कार्यांना चालना देण्याबरोबरच विविध सामाजिक संदेशही देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमांचे आयोजन आगामी दिवसांत शहरातील विविध भागांत करण्यात येणार आहे.

-----------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड

 rajesh pande