नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी लातूरात लक्षवेधी धरणे आंदोलन
लातूर, 20 जुलै (हिं.स.)। नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी लातूर शहरात लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. जंतर-मंतर येथे सुरू असलेले आंदोलन पोलिसांच्या हस्तक्षेपातून म
धरणे आंदोलन


लातूर, 20 जुलै (हिं.स.)।

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी लातूर शहरात लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. जंतर-मंतर येथे सुरू असलेले आंदोलन पोलिसांच्या हस्तक्षेपातून मोडून काढण्याचा प्रयत्न झाल्याचा निषेधही यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

या आंदोलनात लातूर शहरातील विविध सामाजिक संघटना, महिला तसेच तरुणांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. विशेषतः वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा होईपर्यंत लोकशाही मार्गाने सातत्याने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

आंदोलनात ॲड. उदय गवारे, प्राचार्य नागोराव कुंभार, विनायकराव पाटील, रमेश बिरादार, डॉ. बी. आर. पाटील, प्रा. अर्जुन जाधव, प्रा. दत्ता सोमवंशी, माधव बावगे, विश्वंभर भोसले, ॲड. संभाजीराव पाटील, संजय मोरे, धर्मराज पाटील यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande