
परभणी, 20 जुलै (हिं.स.)।
आर्ट ऑफ लिविंग परिवार सेलू यांच्या वतीने नागरिकांसाठी ‘हॅप्पीनेस प्रोग्राम’चे आयोजन करण्यात आले असून या शिबिराद्वारे जगभरात प्रसिद्ध असलेली सुदर्शन क्रिया शिकविण्यात येणार आहे. तणावमुक्त आणि आनंदी जीवनशैलीचा अनुभव देणार्या या कार्यक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षक किशोर घडे यांनी दिली.
29 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये सुदर्शन क्रियेसह विविध ध्यानपद्धती, श्वसन तंत्रे आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या प्रक्रिया शिकविण्यात येणार आहेत. ताणतणाव व्यवस्थापन, अनिद्रा, नैराश्य, निरुत्साह यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शनही या कार्यक्रमात केले जाणार आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुदृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात सर्व वयोगटातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. इच्छुकांनी वेळेत नोंदणी करून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असेही प्रशिक्षक किशोर घडे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis