कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्त्वावरील निदेशक पद भरती
जळगाव,, 20 जुलै (हिं.स.) कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे प्रवेश सत्र ऑगस्ट-२०२६ करिता विविध व्यवसायांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्त्वावरील निदेशकांची नियुक्ती पुढील आदेशापर्यंत करण्यात येणार आहे. संबंधित
कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्त्वावरील निदेशक पद भरती


जळगाव,, 20 जुलै (हिं.स.) कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे प्रवेश सत्र ऑगस्ट-२०२६ करिता विविध व्यवसायांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्त्वावरील निदेशकांची नियुक्ती पुढील आदेशापर्यंत करण्यात येणार आहे. संबंधित व्यवसायातील आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांनी बुधवार, दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता संस्थेत लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा व मुलाखतीसाठी अर्जासह शैक्षणिक पात्रतेच्या मूळ प्रमाणपत्रे व साक्षांकित प्रती घेऊन प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य वाय. के. कुलकर्णी यांनी केले आहे. उपस्थित उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा उपस्थिती भत्ता देण्यात येणार नाही. यात यंत्रकारागीर-१, TDM (J&F)-३, TDM (D&M)-१, यंत्रकारागीर घर्षक-२, कातारी-१, ट्रॅक्टर मेकॅनिक-१, गणित चित्रकला निदेशक-७, एम्प्लॉयबिलिटी स्किल्स निदेशक-६, संधाता-१, विजतंत्री-१, फॉन्डीमॅन-१, यांत्रिक डिझेल-२, पी.पी.ओ.-१ व जोडारी-१ अशा विविध पदांसाठी ही भरती करण्यात येणार असून पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य वाय.के. कुलकर्णी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande