कोल्हापूरात महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश
कोल्हापूर, 20 जुलै (हिं.स.)। कागल येथील राष्ट्रीय महामार्ग तसेच हॅम (HAM) योजनेंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटीकरणासह विविध रस्ते कामांचा आढावा मंत्री मुश्रीफ यांनी घेतला. या महत्त्वाच्या कामांसाठी प्रमुख कंत्राटदारांकडून विविध ठिकाणी उपकंत्रा
राष्ट्रीय महामार्ग  कामाचा आढावा घेताना मंत्री मुश्रीफ


कोल्हापूर, 20 जुलै (हिं.स.)। कागल येथील राष्ट्रीय महामार्ग तसेच हॅम (HAM) योजनेंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटीकरणासह विविध रस्ते कामांचा आढावा मंत्री मुश्रीफ यांनी घेतला. या महत्त्वाच्या कामांसाठी प्रमुख कंत्राटदारांकडून विविध ठिकाणी उपकंत्राटदारांमार्फत कामे करून घेण्यात येत असून, त्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. अशा कंत्राटदारांना तातडीने काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश त्यांनी बैठकीत दिले. राष्ट्रीय महामार्गाच्या कामांबाबत गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ग्रामस्थांकडून वारंवार विविध तक्रारी प्राप्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये वाहतूक कोंडी, सांडपाणी व पावसाच्या पाण्याचा निचरा, पुलांची उंची तसेच पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील अडचणींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या समस्यांच्या अनुषंगाने तसेच सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी येत्या गुरुवारी कागल नगरपालिका सभागृहात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधित कंत्राटदार आणि स्थानिक नागरिक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याशिवाय, त्यांनी कसबा सांगव व धामणे येथील जलजीवन मिशन योजनेतील कामे, बेलेवाडी मासा येथील पाझर तलाव, म्हाडा गृह प्रकल्प आदी विषयांबाबत आढावा घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande