सोलापुरातील बसवारूढ मठाला धमकीचे पत्र; धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा
सोलापूर, 20 जुलै (हिं.स.)। सोलापुरातील मजरेवाडी परिसरातील बसवारूढ मठात आक्षेपार्ह मजकूर असलेली चिठ्ठी टाकून धार्मिक भावना दुखावल्याचा तसेच धमकी दिल्याचा आरोप एका महिलेवर करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस
सोलापुरातील बसवारूढ मठाला धमकीचे पत्र; धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा


सोलापूर, 20 जुलै (हिं.स.)। सोलापुरातील मजरेवाडी परिसरातील बसवारूढ मठात आक्षेपार्ह मजकूर असलेली चिठ्ठी टाकून धार्मिक भावना दुखावल्याचा तसेच धमकी दिल्याचा आरोप एका महिलेवर करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजरेवाडी येथील कस्तुरबा नगर (प्लॉट क्र. 198) परिसरातील बसवारूढ मठात हा प्रकार घडला. सिद्धेश्वर नगर भाग-3, नई जिंदगी परिसरात राहणाऱ्या एका महिलेने मठ परिसरात आक्षेपार्ह मजकूर असलेली चिठ्ठी टाकल्याचा आरोप आहे. या कृतीमुळे धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करण्यात आली.या प्रकरणी शिवानंद मोपगार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 686/2026 नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 299 (धार्मिक भावना दुखावणे) आणि कलम 351(1)(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande