मंदिर विकासासाठी सुनील भोंबे पाटील यांची 4.21 लाखांची देणगी : पुरातन श्री सिद्धेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धार व विकासकामांना मिळणार गती
परभणी, 20 जुलै (हिं.स.)। सामाजिक बांधिलकीचे भान जपत उद्योजक व समाजसेवक सुनील भोंबे पाटील यांनी जिंतूर येथील पुरातन श्री सिद्धेश्वर मंदिराच्या विकासासाठी तब्बल 4 लाख 21 हजारांची देणगी धनादेशाद्वारे मंदिर समितीकडे सुपूर्द केली. त्यांच्या या उदात्त
मंदिर विकासासाठी सुनील भोंबे पाटील यांची 4.21 लाखांची देणगी : पुरातन श्री सिद्धेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धार व विकासकामांना मिळणार गती


परभणी, 20 जुलै (हिं.स.)।

सामाजिक बांधिलकीचे भान जपत उद्योजक व समाजसेवक सुनील भोंबे पाटील यांनी जिंतूर येथील पुरातन श्री सिद्धेश्वर मंदिराच्या विकासासाठी तब्बल 4 लाख 21 हजारांची देणगी धनादेशाद्वारे मंदिर समितीकडे सुपूर्द केली. त्यांच्या या उदात्त योगदानाबद्दल मंदिर समितीच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागोराव जाधव होते. यावेळी अॅड. विजयराव देशमुख, नगराध्यक्ष प्रताप देशमुख, नगरसेवक गोपाळ रोकडे, डॉ. दुर्गादास कानडकर, दत्तराव गाडेकर, गंगाप्रसाद घुगे तसेच पंचायत समितीचे अध्यक्ष किशोर खिस्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत सुनील भोंबे पाटील यांनी मंदिर विकासासाठीचा धनादेश मंदिर समितीकडे सुपूर्द केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. विजयराव देशमुख यांनी केले. यावेळी बोलताना नागोराव जाधव आणि नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी श्री सिद्धेश्वर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील दानशूर व्यक्ती व भाविकांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. धार्मिक स्थळांच्या विकासामुळे परिसराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीलाही चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले. भाविकांच्या सहकार्यामुळे मंदिरासह परिसराच्या सुशोभीकरणाची आणि विविध विकासकामांची पूर्तता अधिक प्रभावीपणे करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मंदिर समितीचे सदस्य धनंजय जाधव, अनिल गाडेकर, व्यापारी वर्ग तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील भोंबे पाटील यांनी दिलेल्या देणगीमुळे श्री सिद्धेश्वर मंदिराच्या विकासकामांना नवी दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande