बीडमध्ये कोणतीही घटना घडली की माझ्याच नावावर पावती फाडली जाते- धनंजय मुंडे यांची खंत
बीड, 20 जुलै (हि.स.) : बीड जिल्ह्यात कोणतीही घटना घडली, कुठलाही खडा पडला तरी त्याची पावती माझ्याच नावावर फाडली जाते. प्रत्येक ठिकाणी माझ्याविरोधात भाषण केले जाते. मी काल माझ्या आयुष्यात कधीच एवढा अस्वस्थ झालो नव्हतो, अशा शब्दांत आमदार धनंजय मुंडे
धनंजय मुंडे


बीड, 20 जुलै (हि.स.) : बीड जिल्ह्यात कोणतीही घटना घडली, कुठलाही खडा पडला तरी त्याची पावती माझ्याच नावावर फाडली जाते. प्रत्येक ठिकाणी माझ्याविरोधात भाषण केले जाते. मी काल माझ्या आयुष्यात कधीच एवढा अस्वस्थ झालो नव्हतो, अशा शब्दांत आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त करत खंत व्यक्त केली.

एका कार्यक्रमात बोलताना मुंडे यांनी आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणावर टीका करत विकासकामांवर भर देण्याची गरज व्यक्त केली. केवळ एका व्यक्तीला बदनाम करून एखाद्या गावाची किंवा परिसराची प्रगती थांबू शकत नाही. विकासाच्या कामांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणापेक्षा जनतेच्या हितासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे ते म्हणाले. धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या विधानाकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले असून, आगामी काळात या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande