बीड जिल्हास्तरीय खरीप २०२६ पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण संपन्न
बीड, 21 जुलै (हिं.स.)। खरीप हंगाम २०२६ मधील पीक कापणी प्रयोग अचूक, पारदर्शक व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पाडण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सतीश सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच जिल्हा नियोजन समिती सभागृह , जिल्हाधिकारी कार्यालय, बीड य
प्रशिक्षण


बीड, 21 जुलै (हिं.स.)। खरीप हंगाम २०२६ मधील पीक कापणी प्रयोग अचूक, पारदर्शक व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पाडण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सतीश सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच जिल्हा नियोजन समिती सभागृह , जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे खरीप हंगाम २०२६-२७ पीक कापणी प्रयोग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

या प्रशिक्षणास जिल्ह्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी ( जि.प ) तसेच महसूल, जिल्हा परिषद व कृषी विभागाचे संबंधित प्रमुख अधिकारी,विमा कंपनी प्रतिनिधी , एनएसएसओ विभागीय कार्यालय, प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षणामध्ये पीक कापणी प्रयोगाचे महत्त्व, प्रयोगाची निवड, प्रयोगाची पूर्वतयारी, प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगाची कार्यपद्धती, नमुना प्लॉटची निवड, उत्पादनाचे मोजमाप तसेच प्रयोगाची नोंदणी व ऑनलाइन प्रणालीमध्ये माहिती भरण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम २०२६-२७ अंतर्गत बाजरी, मका , मुग, उडीद, तूर , सोयाबीन , भुईमुग , कापूस व कांदा हे पिके अधिसूचित असून सदर पिकांचे पिक कापणी प्रयोगांचे नियोजन करण्यात आलेले आहे. पीक कापणी प्रयोगांच्या आधारे पिकांची प्रत्यक्ष उत्पादकता निश्चित केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा अचूक अंदाज घेण्यासाठी तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई व उत्पादन निश्चितीच्या दृष्टीने पीक कापणी प्रयोग अत्यंत महत्त्वाचे आहेत. या प्रयोगांमध्ये अचूकता, पारदर्शकता आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

खरीप हंगाम २०२६ मधील सर्व पीक कापणी प्रयोग वेळेत, नियमानुसार व शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. खरीप हंगाम २०२६ पीक कापणी प्रयोग प्रशिक्षणादरम्यान महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande