सोलापूर पालिकेचे ५१ कोटींचे नुकसान; तत्कालीन आयुक्तांकडून वसुलीची भाजपची मागणी
सोलापूर, 21 जुलै (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील सिटी बसच्या चेसी क्रॅक प्रकरणामुळे महापालिकेला सुमारे ५१ कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसल्याचा मुद्दा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा ऐरणीवर आला. या प्रकरणात तत्कालीन महापालि
smc


सोलापूर, 21 जुलै (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील सिटी बसच्या चेसी क्रॅक प्रकरणामुळे महापालिकेला सुमारे ५१ कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसल्याचा मुद्दा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा ऐरणीवर आला. या प्रकरणात तत्कालीन महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना जबाबदार धरून, महापालिकेचे झालेले आर्थिक नुकसान त्यांच्या वैयक्तिक जबाबदारीतून वसूल करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षा तथा स्वीकृत नगरसेविका रोहिणी तडवळकर यांनी सभागृहात केली.

तडवळकर म्हणाल्या की, सिटी बस खरेदी प्रक्रियेनंतर समोर आलेल्या चेसी क्रॅक प्रकरणामुळे महापालिकेवर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. नागरिकांच्या कराच्या पैशाचे नुकसान झाल्याने या प्रकरणातील जबाबदार अधिकारी आणि संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करून त्यांच्याकडून महापालिकेचे नुकसान भरून घ्यावे. तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई करून जबाबदारी निश्चित करावी, अशीही त्यांनी मागणी केली. या मागणीमुळे सिटी बस चेसी क्रॅक प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, प्रशासन या प्रकरणात पुढे कोणती भूमिका घेणार आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे नागरिकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande