लातूर - मालमत्ता कराच्या व्याज शास्तीमध्ये सवलतीस 23 जुलै पर्यंत मुदतवाढ
लातूर, 21 जुलै (हिं.स.)थकीत कराचा दि. २० जुलै पूर्वी एकरकमी भरणा करणाऱ्या नागरिकांना व्याज शास्तीमध्ये १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय मनपाच्या वतीने घेण्यात आला होता. त्यानुसार ६३०० मालमत्ताधारकांकडून कर भरणा केला. उर्वरित नागरिकांच्या सोयीसाठी या
मुदतवाढ


लातूर, 21 जुलै (हिं.स.)थकीत कराचा दि. २० जुलै पूर्वी एकरकमी भरणा करणाऱ्या नागरिकांना व्याज शास्तीमध्ये १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय मनपाच्या वतीने घेण्यात आला होता. त्यानुसार ६३०० मालमत्ताधारकांकडून कर भरणा केला. उर्वरित नागरिकांच्या सोयीसाठी या सवलतीस मुदतवाढ देणे बाबत महापौर जयश्रीताई सोनकांबळे, उपमहापौर स्नेहल उटगे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, सभागृह नेते विजयकुमार साबदे,विरोधी पक्षनेते देविदास काळे यांनी प्रशासनास निर्देशित केले होते. त्यानुसार आयुक्त श्री राहुल कुलकर्णी यांनी ३ दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

शहरातील बर्याच नागरिकांकडे कर थकीत आहे.नागरिकांनी हा कर वेळेत भरावा यासाठी मनपाच्या वतीने वेळोवेळी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांना कर भरणे सुलभ व्हावे यासाठी अनेकदा सवलती देण्यात आल्या होत्या. तसेच थकीत करावरील व्याजात सवलत दिनांक ६ ते २० जुलै या कालावधीत थकीत कराचा एकरकमी भरणा करणाऱ्या नागरिकांना व्याज शास्तीमध्ये १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.

त्यामुळे नागरिकांनी सुट योजनेचा लाभ घेवून टॅक्स भरला होता परंतु अद्यापही काही थकबाकीदार बाकी असल्याने व योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी असल्याने या सवलत योजनेस आणखी ३ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.त्यामुळे ज्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता आला नाही त्यांना दि. २१ ते २३ जुलै दरम्यान आपल्याकडील थकीत कराचा भरणा मनपाकडे करता येणार आहे. नागरिकांनी या सवलत योजनेचा लाभ घेऊन आपल्याकडील थकीत कर मनपाकडे एकरकमी भरणा करावा, असे आवाहन मनपाच्या कर संकलन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande