लातूर- एसआयआर अभियानांतर्गत बनावट व फसव्या संदेशांपासून सावध राहण्याचे नागरिकांना आवाहन
लातूर, 21 जुलै (हिं.स.) - अहमदपूरमध्ये विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) अभियानांतर्गत बनावट व फसव्या संदेशांपासून सावध राहण्याचे उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे यांचे नागरिकांना आवाहनभारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात सध्या विशेष सखोल पुनरावलोकन (
मंजुषा लटपटे


लातूर, 21 जुलै (हिं.स.) - अहमदपूरमध्ये विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) अभियानांतर्गत बनावट व फसव्या संदेशांपासून सावध राहण्याचे उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे यांचे नागरिकांना आवाहनभारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात सध्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR)-२०२६ अभियान अत्यंत व्यापक स्वरूपात राबविण्यात येत असून, या अभियानाची जोरदार प्रचार व प्रसिद्धी सुरू असतानाच नागरिकांची फसवणूक करण्यासाठी काही अज्ञातांकडून बनावट व संशयास्पद मोबाईल संदेश पाठवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अशा फसव्या संदेशांबाबत अत्यंत सतर्क राहावे आणि कोणत्याही अज्ञात स्रोतांकडून आलेले संशयास्पद संदेश उघडू नयेत किंवा त्यांना अजिबात प्रतिसाद देऊ नये, असे महत्त्वाचे आवाहन अहमदपूरच्या उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे यांनी केले आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार सर्व संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून व्यापक जनजगृती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मोहिमेत नागरिकांनी कोणत्याही अज्ञात लिंक्सवर क्लिक करण्यापूर्वी किंवा आपली वैयक्तिक माहिती शेअर करण्यापूर्वी संदेशाची सत्यता काटेकोरपणे पडताळून पाहणे गरजेचे आहे. मतदारांनी SIR च्या संदर्भात प्राप्त झालेल्या कोणत्याही बनावट किंवा फसव्या संदेशांना अजिबात प्रतिसाद देऊ नये तसेच कोणत्याही व्यक्तीशी बँक खात्याची गोपनीय माहिती, OTP (वन टाईम पासवर्ड) किंवा इतर कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नये आणि कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून त्यांच्या कोणत्याही सेवेसाठी किंवा कामासाठी नागरिकांकडून कधीही कोणतेही शुल्क आकारले जात नाही, त्यामुळे नागरिकांनी केवळ भारत निवडणूक आयोग किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून, अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरून अथवा संबंधित BLO, AERO किंवा ERO यांच्या अधिकृत सूचनांवर आणि पत्रव्यवहारावरच पूर्ण विश्वास ठेवावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे यांनी अहमदपूर मतदारसंघातील नागरिकांना केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande