कर्जमाफीच्या निकषांबाबत संभ्रम ; अंजनगाव बारी परिसरातील शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये वाढल्या फेऱ्या
अमरावती, 21 जुलै (हिं.स.) : राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ नेमका कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने अंजनगाव बारी परिसरातील शेतकरी संभ्रमात असून, राष्ट्रीयकृत तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या
शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये फेऱ्या वाढल्या; अद्यापही कर्जमाफीबाबत संभ्रम कायम


अमरावती, 21 जुलै (हिं.स.) : राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ नेमका कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने अंजनगाव बारी परिसरातील शेतकरी संभ्रमात असून, राष्ट्रीयकृत तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखांमध्ये चौकशीसाठी दररोज गर्दी होत आहे.

कर्जमाफीच्या पात्रतेसंदर्भातील अधिकृत निकष व लाभार्थ्यांच्या याद्या अद्याप जाहीर झालेल्या नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतकरी आपल्या कर्ज खात्याची माहिती घेण्यासाठी तसेच आपण कर्जमाफीसाठी पात्र आहोत की नाही, याची खातरजमा करण्यासाठी बँकांच्या फेऱ्या मारत आहेत.

यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने खरीप हंगामातील पेरण्या व शेतीची कामे प्रभावित झाली आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर पीककर्जाची परतफेड, कर्जमाफीचा लाभ आणि पुढील कर्ज वितरणाबाबत चिंता वाढली आहे.

शासनाने निश्चित निकषांमध्ये बसणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असे सांगितले असले तरी अधिकृत लाभार्थी यादी अद्याप प्रसिद्ध झालेली नसल्याने शेतकऱ्यांमधील संभ्रम कायम आहे. त्यामुळे शासनाने पात्रतेचे निकष आणि लाभार्थ्यांची यादी लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande