जिल्हा परिषद सेस निधीतून कृषी साहित्यावर ७५ टक्के अनुदान; अर्ज करण्याची ३१ जुलैपर्यंत मुदत
अमरावती, 21 जुलै (हिं.स.) : पंचायत समिती अमरावतीमार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद सेस निधीतून पात्र शेतकऱ्यांना विविध कृषी साहित्यावर ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत कृषी विभागाकडे अर्ज सादर करावेत,
जिल्हा परिषद सेस निधीतून कृषी साहित्यावर ७५ टक्के अनुदान; अर्ज करण्याची ३१ जुलैपर्यंत मुदत


अमरावती, 21 जुलै (हिं.स.) : पंचायत समिती अमरावतीमार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद सेस निधीतून पात्र शेतकऱ्यांना विविध कृषी साहित्यावर ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत कृषी विभागाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत एचडीपीई व पीव्हीसी सिंचन पाइप, तीन व पाच एचपी क्षमतेचे सबमर्सिबल पंप, ताडपत्री, बॅटरीवर चालणारे स्प्रे पंप, बैलचलित, हस्तचलित व ट्रॅक्टरचलित शेती अवजारे तसेच सौर शॉक झटका मशीन यांसारख्या कृषी साहित्याच्या खरेदीवर ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे.

योजनेत अनुसूचित जाती-जमाती, दिव्यांग आणि महिला शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आयएसआय दर्जाचे साहित्य अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करणे बंधनकारक राहणार आहे.

प्राप्त अर्जांची पंचायत समिती स्तरावर छाननी करण्यात येईल. त्यानंतर जिल्हास्तरावर सोडतीद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाईल. निवड झालेल्या शेतकऱ्यांना पूर्वसंमतिपत्र देण्यात येईल आणि त्यानंतर ४५ दिवसांच्या आत संबंधित कृषी साहित्याची खरेदी करावी लागणार आहे.

गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, अतिरिक्त गट कार्यकारी अधिकारी अंकिता लाड, कृषी अधिकारी पवन ढोणे आणि कृषी विस्तार अधिकारी ईशा कोडापे यांनी पात्र शेतकऱ्यांनी विहित मुदतीत अर्ज करून शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande