बीड : गेवराई विधानसभा मतदारसंघात जनसेवा सप्ताहाचे आयोजन
बीड, 21 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गेवराई विधानसभा मतदारसंघात ''जनसेवा सप्ताह'' आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात
जनसेवा सप्ताहाचे आयोजन


बीड, 21 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गेवराई विधानसभा मतदारसंघात 'जनसेवा सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात रक्तदान शिबिर, दिव्यांगांना अनुदान मंजुरीपत्र वाटप, रेशीम शेती कार्यशाळा, विचारवंत संजय आवटे यांचे व्याख्यान तसेच मोफत कृत्रिम हात-पाय वाटप अशा विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande