
छत्रपती संभाजीनगर, 21 जुलै (हिं.स.)। हर्सूल टी पॉइंट ते सिडको जळगाव हायवे या रस्त्याचे मुख्य सिमेंट कॉंक्रिटीकरण काम पूर्ण झाले आहे. मात्र रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अप्रोच रस्त्यांची कामे प्रलंबित असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदाराला तात्काळ अप्रोचचे काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार SBOA चौक, अहिल्यादेवी चौक व संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या अप्रोचच्या कामाची पाहणी करण्यात आली.
यावेळी ठेकेदाराला स्ट्रॉम वॉटर लाईन, केर्ब स्टोन/कॅट्स आय , रोड बॅरियर फेन्सिंग आणि इतर सर्व प्रलंबित कामे देखील दर्जेदार व लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis