बाजार समितीच्या सभापतींविरोधात अविश्वास ठरावाची हालचाल
अमरावती, 21 जुलै (हिं.स.) दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक होऊन तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. विद्यमान सभापती सुनील गावंडे हे तेव्हापासून सभापतिपदाची धुरा सांभाळत आहेत. मात्र, गावंडे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करी
बाजार समितीच्या सभापतींविरोधात अविश्वास ठरावाची हालचाल


अमरावती, 21 जुलै (हिं.स.) दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक होऊन तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. विद्यमान सभापती सुनील गावंडे हे तेव्हापासून सभापतिपदाची धुरा सांभाळत आहेत. मात्र, गावंडे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समितीतील १८ पैकी १२ संचालकांनी सभापतींविरोधात अविश्वास ठरावाची प्रक्रिया सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी, अमरावती यांच्याकडे स्वाक्षरीयुक्त निवेदन सादर केले आहे. या निवेदनावर उपसभापती राजीव कराळे, ज्येष्ठ संचालक साहेबराव भदे, बांधकाम सभापती राजीव खेडकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तथा संचालिका कांचनमाला गावंडे, गजानन देवतळे, अडते व्यापारी संचालक प्रभाकर तराळ, राजू राठी, अनिल भारसाकळे, हमाल-मापारी संचालक आसिफभाई, माजी सभापती तथा विद्यमान संचालक बाळासाहेब वानखडे, मनीष कोरपे आणि सुनील डिके यांच्या स्वाक्षऱ्या असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, सभापती सुनील गावंडे यांच्या समर्थनार्थ अद्याप पाच संचालक असल्याचे समजते. त्यामध्ये बाळासाहेब हिंगणीकर, राजू वडाळ, मनीषा अरबट, भारत आठवले आणि डॉ. अभय गावंडे यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुढील प्रक्रियेबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

--------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande