
छत्रपती संभाजीनगर, 21 जुलै (हिं.स.)। मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत चुरस वाढली आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सतीश चव्हाण यांनी तयारीचे संकेत दिल्यानंतर भाजपने नाराजी व्यक्त केली.
हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. भाजप नेत्यांनी सांगितले की. मराठवाडा पदवीधर मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे मोठे प्राबल्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत निश्चितपणे विजय प्राप्त होऊ शकतो. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने चांगले काम केले आहे. यामुळे राष्ट्रवादी पेक्षा भाजपला जागा हवी आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis