पुणे : विद्यार्थ्यांनीच द्यावा शून्य कचऱ्याचा संदेश; महापौर लांडगे यांचे आवाहन
पुणे, 21 जुलै (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भोसरी येथील इंग्लिश मीडियम शाळेत आसरा सोशल फाउंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या ‘शून्य कचरा शाळा’ उपक्रमाला शहराचे महापौर रवि लांडगे यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
Jsjs


पुणे, 21 जुलै (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भोसरी येथील इंग्लिश मीडियम शाळेत आसरा सोशल फाउंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या ‘शून्य कचरा शाळा’ उपक्रमाला शहराचे महापौर रवि लांडगे यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पर्यावरण संवर्धन, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, पुनर्वापर, पुनर्निर्मिती आणि स्वच्छतेच्या सवयी लहानपणापासूनच अंगीकारण्याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.

यावेळी महापौर रवि लांडगे यांनी शून्य कचऱ्याची संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक असून त्याची सुरुवात विद्यार्थ्यांपासून झाली, तर भविष्यात पर्यावरणाबाबत संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडतील, असे त्यांनी नमूद केले. महापौरांनी विद्यार्थ्यांना आपल्या घरात आणि परिसरातही शून्य कचऱ्याचा संदेश पोहोचविण्याचे आवाहन केले. शाळांमधील अशा उपक्रमांमुळे स्वच्छतेची सवय, कचरा व्यवस्थापनाची जाणीव आणि पर्यावरण संरक्षणाची भावना अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली. ओला व सुका कचरा वर्गीकरण, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, पुनर्वापर आणि स्वच्छ परिसर राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे महापौरांनी विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमास आसरा सोशल फाउंडेशनच्या अर्चना मोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका विनिता डिसुजा, शिक्षक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande