
सोलापूर, 21 जुलै (हिं.स.)।सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहासात एका सर्वसाधारण सभेत विक्रमी १८० हून अधिक ठराव मंजूर झाल्यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी महापौर विनायक कोंड्याल यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. महापौरांच्या प्रभावी, शांत आणि संयमी कामकाजाच्या शैलीचे त्यांनी कौतुक केले.
सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर तब्बल १८० हून अधिक विषयांचा समावेश होता. महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. प्रत्येक नगरसेवकाला आपली भूमिका मांडण्याची संधी देत, अनावश्यक वेळ न दवडता सभेचे कामकाज सुरळीतपणे पूर्ण करण्यात आले. सभेदरम्यान नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांनाही महापौरांनी समर्पक उत्तरे देत सभेचे प्रभावी संचालन केले.
सभेनंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी महापौर कोंड्याल यांचा सत्कार करत महानगरपालिकेच्या इतिहासातील विक्रमी संख्येने ठराव मंजूर करून शहराच्या विकासकामांना गती देणारे कामकाज केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक विनोद भोसले, प्रशांत पल्ली, सिद्धेश्वर कमटम, विजय चिप्पा, यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड