माजलगाव : उस्मानिया फाउंडेशनच्या तीन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
एनजीओच्या नावाखाली ऑनलाइन देणग्या उकळून फसवणुकीचे प्रकरण बीड, 23 जुलै (हिं.स.) : सामाजिक कार्य आणि गरजू नागरिकांना आर्थिक मदत करण्याच्या नावाखाली सोशल मीडियावरून ऑनलाइन देणग्या गोळा करून त्यांचा अपहार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकर
गुन्हा  दाखल


एनजीओच्या नावाखाली ऑनलाइन देणग्या उकळून फसवणुकीचे प्रकरण

बीड, 23 जुलै (हिं.स.) : सामाजिक कार्य आणि गरजू नागरिकांना आर्थिक मदत करण्याच्या नावाखाली सोशल मीडियावरून ऑनलाइन देणग्या गोळा करून त्यांचा अपहार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी माजलगाव येथील उस्मानिया फाउंडेशनच्या तीन प्रमुख पदाधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार मोहम्मद मोहसीन मोहम्मद जमीर शेख (वय 36, रा. बीड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा प्रकार समोर आला.

उस्मानिया फाउंडेशन ही नोंदणीकृत संस्था सोशल मीडियाच्या माध्यमातून गरीब आणि गरजू नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी देणग्यांचे आवाहन करत होती.

छत्रपती संभाजीनगर दहशतवाद विरोधी पथकाच्या युनिट कॅम्प बीडने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या क्यूआर कोड आणि यूपीआय आयडीची पडताळणी केली. तपासात देणगीची रक्कम संस्थेच्या अधिकृत बँक खात्यात जमा न होता थेट पदाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यांमध्ये वर्ग होत असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आलीम खिजर सय्यद (वय 29, रा. फुलेनगर, माजलगाव), उपाध्यक्ष हसीब शेख रशिद शेख (वय 34, रा. फुलेनगर, माजलगाव) आणि सचिव शेख हकीम शेख नईम (वय 30, रा. आयेशानगर, माजलगाव) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी नागरिकांचा विश्वास संपादन करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी देणगीची रक्कम वैयक्तिक खात्यांमध्ये जमा करून अपहार केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये विविध कलमांअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.-------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande