
लातूर, 25 जुलै (हिं.स.)। वाहनचोरी करणाऱ्यांविरोधातील विशेष मोहिमेत लातूर स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
बरकत नगर व मळवटी रोड, लातूर येथे राबवण्यात आलेल्या कारवाईत दोन सराईत दुचाकीचोरांना अटक करण्यात आली. आरोपींकडून ८ चोरीच्या दुचाकी जप्त करत २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईमुळे लातूर व पुणे जिल्ह्यातील एकूण ८ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, राजेश घाडगे, सहायक फौजदार सर्जेराव जगताप तसेच पोलीस अमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, रियाज सौदागर, मोहन सुरवसे, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठ्ठेवाड, प्रेम राठोड, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, तुराबखान पठाण, गणेश साठे, गोविंद भोसले, श्रीनिवास जांभळे, शैलेश सुडे व अंजली गायकवाड यांनी ही यशस्वी कारवाई केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis