
नाशिक, 24 जुलै (हिं.स.)।
: क्रेडिटवर कच्चा माल घेऊन त्याच्या बिलाच्या रकमेपोटी असलेली १३ लाख २५ हजार रुपयांची रक्कम परत न करता फसवणूक करणाऱ्या दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत गव्हर्नमेंट सप्लायर कार्यालयाचे अधिकारी मयूर अधिकराव पाटील (रा. नवीन नाशिक) यांनी तक्रार दिली आहे. त्यात म्हटले, की मे २०२५ ते २८ एप्रिल २०२६ या कालावधीत गोविंदनगर येथील ठक्कर एनक्लेव्हमधील फ्लॅट नंबर ४०२ या ठिकाणी मे. सॉफ्ट स्टिच ट्रिम इंडस्ट्रीजतर्फे भागीदार आरोपी
अमोल सुरेश चौधरी व योगेश सुरेश चौधरी (दोघेही रा. रुंगटा टाऊनशिप, राजीवनगर, नाशिक) यांनी त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर रेल्वेच्या ऑर्डरसाठी फिर्यादीच्या फर्मच्या माध्यमातून क्रेडिटवर कच्चा माल घेतला; मात्र या कच्च्या मालाच्या बिलाच्या पोटी असलेली १३ लाख २५ हजार ४५४ रुपये फिर्यादीला परत न करता आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी अमोल चौधरी व योगेश चौधरीविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV