वर्क फ्रॉम होमचा बनाव करून सव्वापाच लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा
नाशिक, 24 जुलै (हिं.स.)। : वर्क फ्रॉम होमचा बहाणा करून फुल, पार्ट टाईम जॉब देण्याचे आमिष दाखवून एकाला सव्वापाच लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. ११ ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम
वर्क फ्रॉम होमचा बनाव करून सव्वापाच लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा


नाशिक, 24 जुलै (हिं.स.)।

: वर्क फ्रॉम होमचा बहाणा करून फुल, पार्ट टाईम जॉब देण्याचे आमिष दाखवून एकाला सव्वापाच लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. ११ ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान अज्ञात इसमांनी तक्रारदार यांच्याशी संपर्क साधला. वर्क फ्रॉम होम फुल, पार्ट टाईम जॉब देण्याचा बनाव करून टेलिग्राम अकाऊंट होल्डर, तसेच प्रीमियम व लक्झरी ग्रुपच्या होल्डर यांनी तक्रारदार यांना गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार अज्ञात संशयितांनी टेलिग्राम अकाऊंट होल्डर व त्याच्या माध्यमातून संपर्क साधणाऱ्या इसमांनी तक्रारदाराला ५ लाख २३ हजार ७९४ रुपये विविध बँकांना जमा करण्यास सांगून त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोल्हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande