
बीड, 26 जुलै (हिं.स.)। बीड स्थानिक गुन्हे शाखेने शेळी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीसाठी वापरलेले वाहन, रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल असा एकूण ₹8 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वडवणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या शेळी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने गांधीनगर परिसरातून सुभाष किसन विटकर याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत रशीद आणि इम्रान चाँद शेख या दोघांनाही अटक करण्यात आली. चौकशीत आरोपींनी वडवणी, धारूर, नेकनूर आणि तळवडा परिसरात दिवस व रात्रीच्या वेगवेगळ्या वेळेत शेळ्या चोरी केल्याची कबुली दिली. या टोळीविरुद्ध वडवणी, नेकनूर, धारूर व तळवडा पोलीस ठाण्यात एकूण सहा गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis