
लातूर, 26 जुलै (हिं.स.)।
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे उदगीर तालुका पत्रकार जयंती महोत्सव समितीच्या वतीने बुधवार दिनांक 29 जुलै 2016 रोजी सायं सहा वाजता नगरपरिषद प्रांगण उदगीर येथे करण्यात आले. यावेळी माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ स्वातीताई पुढे या असणार आहेत. यावेळी कृषी सभापती शिवाजीरावडे, माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी आमदार गोविंद केंद्रे, बसवराज पाटील नागराळकर, राजेश्वर उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे, माजी सभापती सिद्धेश्वर मुन्ना पाटील, पोलीस निरीक्षक दिलीप गाडे, पोलीस निरीक्षक बिरप्पा भुसनर आदी उपस्थित राहणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis