नेपाळमध्ये एमबीए प्रश्नपत्रिका लीक प्रकरण तापले; विद्यापीठाच्या डीनच्या राजीनाम्याची मागणी
काठमांडू, 26 जुलै (हिं.स.)। नेपाळमध्येही एमबीएची प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. तसेच प्रश्नपत्रिका लीक प्रकरणात विद्यापीठाच्या डीनच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. देशाती
पेपर लीक


काठमांडू, 26 जुलै (हिं.स.)। नेपाळमध्येही एमबीएची प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. तसेच प्रश्नपत्रिका लीक प्रकरणात विद्यापीठाच्या डीनच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.

देशातील सर्वात जुने त्रिभुवन विद्यापीठ (टीयू) येथील स्वतंत्र विद्यार्थी संघाने एमबीए प्रश्नपत्रिका लीक प्रकरणाची दोन दिवसांच्या आत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासोबतच संघाने व्यवस्थापन संकायाचे डीन आणि परीक्षा पाहणारे सहाय्यक डीन यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशीही मागणी केली आहे.

स्वतंत्र विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दीपक जोशी यांनी सांगितले, “परीक्षेची निष्पक्षता आणि विद्यापीठाची प्रतिष्ठा यांच्याशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. दोन दिवसांच्या आत या घटनेची निष्पक्ष चौकशी करून सत्य सार्वजनिक केले पाहिजे.” त्यांनी पुढे सांगितले की, प्रश्नपत्रिका कशी लीक झाली आणि त्यामध्ये कोणाचा सहभाग होता, याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. दोषींवर कारवाई झाली नाही, तर व्यवस्थापन संकायाचे डीन आणि परीक्षा पाहणारे सहाय्यक डीन यांनी राजीनामा द्यावा, असा इशाराही जोशी यांनी दिला.

प्रश्नपत्रिका लीक केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका समितीचीही स्थापना करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande