नेपाळमध्ये पंचवीस हजार पर्यंतच्या नव्या भारतीय नोटा नेण्यास-मागे आणण्यास परवानगी
काठमांडू , 27 जुलै (हिं.स.)। नेपाळने भारतीय आणि नेपाळी नागरिकांना 9 नोव्हेंबर 2016 नंतर जारी केलेल्या 200 आणि 500 च्या भारतीय नोटा, जास्तीत जास्त 25,000 पर्यंत नेपाळमध्ये आणण्याची आणि नेपाळमधून बाहेर घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे. नेपाळ राष्ट्र बँ
नेपाळमध्ये पंचवीस हजार पर्यंतच्या नव्या भारतीय नोटा नेण्यास-मागे आणण्यास परवानगी


काठमांडू , 27 जुलै (हिं.स.)। नेपाळने भारतीय आणि नेपाळी नागरिकांना 9 नोव्हेंबर 2016 नंतर जारी केलेल्या 200 आणि 500 च्या भारतीय नोटा, जास्तीत जास्त 25,000 पर्यंत नेपाळमध्ये आणण्याची आणि नेपाळमधून बाहेर घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे. नेपाळ राष्ट्र बँकेने (एनआरबी) नवीन अधिसूचना जारी करून नियमांचे स्पष्टीकरण दिले आहे.

केंद्रीय बँकेनुसार, 8 नोव्हेंबर 2016 पूर्वी जारी केलेल्या 500 आणि 1,000 च्या जुन्या भारतीय नोटांवरील बंदी पूर्वीप्रमाणेच कायम राहील. तसेच, नेपाळी नागरिक भारतीय चलन केवळ भारतातूनच नेपाळमध्ये आणू शकतील आणि नेपाळमधून कोणत्याही तिसऱ्या देशात घेऊन जाऊ शकणार नाहीत.

एनआरबी चे प्रवक्ते गुरु प्रसाद पौडेल म्हणाले की, नवीन नियमांमुळे नेपाळमध्ये येणाऱ्या भारतीय पर्यटकांना आणि भारतासोबत व्यापार करणाऱ्या नेपाळी नागरिकांना सुविधा मिळेल. अधिसूचनेत असेही म्हटले आहे की, नेपाळी नागरिक आणि परदेशी प्रवासी कस्टम घोषणेशिवाय 5,000 अमेरिकन डॉलर किंवा त्यासमान परदेशी चलन नेपाळमध्ये आणू शकतात. यापेक्षा जास्त रक्कम असल्यास कस्टममध्ये घोषणा करणे अनिवार्य असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande