वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वडवणीत भव्य बंजारा समाज मेळावा
बीड, 27 जुलै (हिं.स.) : वडवणी येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य बंजारा समाज मेळाव्यात राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी उपस्थित राहून समाजबांधवांशी संवाद साधला. यावेळी मंत्री
संजय राठोड


बीड, 27 जुलै (हिं.स.) : वडवणी येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य बंजारा समाज मेळाव्यात राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी उपस्थित राहून समाजबांधवांशी संवाद साधला.

यावेळी मंत्री राठोड यांनी स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे लोकहित, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासासाठीचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

बंजारा समाजाचा इतिहास, संस्कृती आणि समृद्ध वारसा जतन करण्याच्या उद्देशाने वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे उभारण्यात आलेल्या बंजारा नंगारा भवनाची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली. समाजाच्या इतिहासाची आणि परंपरेची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी प्रत्येक समाजबांधवाने नंगारा भवनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला महंत जितेंद्र महाराज, महंत यशवंत महाराज यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेल्या या मेळाव्यात सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक जतन आणि समाजविकासावर विशेष भर देण्यात आला.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande