बीड : उदंड वडगाव येथील नाविन्यपूर्ण शेतीला जिल्हाधिकाऱ्यांची भेट!
बीड, 27 जुलै (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील उदंड वडगाव येथील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय महादेव जाधव व श्री. शंकर जाधव यांच्या शेतीची जिल्हाधिकारी बीड यांनी पाहणी केली.शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून विविध पिकांची यशस्वी लागवड केली आहे. त्यां
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रगतशील शेतकऱ्यांची घेतली भेट


बीड, 27 जुलै (हिं.स.)।

बीड जिल्ह्यातील उदंड वडगाव येथील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय महादेव जाधव व श्री. शंकर जाधव यांच्या शेतीची जिल्हाधिकारी बीड यांनी पाहणी केली.शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून विविध पिकांची यशस्वी लागवड केली आहे. त्यांच्या शेतीमध्ये १० एकर डाळींब, ९ एकर टोमॅटो, १ एकर मिरची, ३ एकर नर्सरी, ५ एकर सोयाबीन तसेच २.५ एकर क्षमतेचे शेततळे उभारण्यात आले असून त्याद्वारे शेतीमध्ये शाश्वत आणि प्रगत पद्धतीचा आदर्श निर्माण केला आहे.

या दोन्ही शेतकऱ्यांच्या कार्याचा सन्मान विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनीही झाला आहे. श्री. शंकर जाधव यांना उद्यान पंडित पुरस्कार – २०२०, तर श्री. दत्तात्रय महादेव जाधव यांना वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार – २०२२ प्रदान करण्यात आला आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण शेती पद्धती, जलसंधारणाचे प्रभावी नियोजन आणि विविध पीक पद्धतींचे कौतुक करत इतर शेतकऱ्यांनीही अशा आधुनिक शेतीचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande