छ. संभाजीनगर जिल्ह्यातील ६३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबण्याची शक्यता
छत्रपती संभाजीनगर, 27 जुलै (हिं.स.)। राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत मतदारयादीचा कार्यक्रम स्थगित केल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पु
छ. संभाजीनगर जिल्ह्यातील ६३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबण्याची शक्यता


छत्रपती संभाजीनगर, 27 जुलै (हिं.स.)। राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत मतदारयादीचा कार्यक्रम स्थगित केल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर-2026) मोहिमेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सुरू होणारी निवडणूक प्रक्रिया थांबली असून इच्छुक उमेदवारांच्या तयारीला ब्रेक लागला आहे. आता सुधारित वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच अंतिम मतदारयादी आणि पुढील निवडणूक कार्यक्रम निश्चित होणार असल्याने गावपातळीवरील राजकारण सध्या 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत गेले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande