आ. माणिकराव कोकाटे यांच्या जनता दरबारात विविध कामांच्या चौकशीचे आदेश
सिन्नर, 27 जुलै (हिं.स.)। प्रशासनाच्या दारात हेलपाटे मारूनही प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांनी जनता दरबारात आपल्या व्यथा मांडल्या. शहरातील ज्वालामाता लॉन्स येथे झालेल्या जनता दरबारात महसूल, महावितरण, ग्रामपंचायत, जलजीवन मिशन, सार्वजनिक बांधकाम, भूम
आ. माणिकराव कोकाटे यांच्या जनता दरबारात विविध कामांच्या चौकशीचे आदेश


सिन्नर, 27 जुलै (हिं.स.)।

प्रशासनाच्या दारात हेलपाटे मारूनही प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांनी जनता दरबारात आपल्या व्यथा मांडल्या. शहरातील ज्वालामाता लॉन्स येथे झालेल्या जनता दरबारात महसूल, महावितरण, ग्रामपंचायत, जलजीवन मिशन, सार्वजनिक बांधकाम, भूमिअभिलेख, नगरपालिका आदी विभागांशी संबंधित तक्रारींचा अक्षरशः भडिमार झाला. आमदार माणिकराव कोकाटे यांनी अनेक तक्रारींचा जागेवरच निपटारा करत नागरिकांना दिलासा दिला, तर उर्वरित प्रकरणांवर संबंधित विभागांना चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

जनता दरबारात वडगाव सिन्नर येथील अनधिकृत वृक्षतोड, ठक्कर बाप्पा योजनेतील निकृष्ट कामे तसेच पाणीपुरवठा विहिरीच्या खोदकामातील अनियमिततेकडे राजेंद्र चव्हाणके यांनी लक्ष वेधले. या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश आमदार कोकाटे यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.

कुंभमेळ्यासाठी वडगाव पिंगळा व चिंचोली शिवारातून जाणार्या राज्य मार्ग क्रमांक 37 च्या भूसंपादनाबाबतही नागरिकांनी आक्षेप नोंदवला. सार्वजनिक बांधकाम विभाग व भूमिअभिलेख विभागाच्या संगनमताने शेतकर्यांचे गोठे, घरे, पोल्ट्री शेड व इतर मालमत्तांचा योग्य समावेश न करता भूसंपादन करण्यात येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. यावर जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार कोकाटे यांनी दिले.

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande