
छत्रपती संभाजीनगर, 27 जुलै (हिं.स.)। भोकरदन येथे पाराशर शिक्षक सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रसंगी पतसंस्थेच्या आर्थिक प्रगतीचा व भावी वाटचालीचा आढावा घेण्यात आला.याच कार्यक्रमात ज्ञानदानाचे मोलाचे कार्य करणाऱ्या सेवानिवृत्त व आदर्श शिक्षकांचा आणि आपल्या यशाने भोकरदनचा मान वाढवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आमदार संतोष दानवे. जि.प. सदस्या सौ.आशाताई पांडे, संस्थेचे चेअरमन संतोष पा. इंगळे, व्हाईस चेअरमन विजय खडके, अझर पठाण, सुनील वानखेडे, योगेश गाडेकर, माणिक दानवे, सचिन शास्त्री, डी.एस. अकोदे, के.वाय. सोनवणे, के.डी. वाघ, शेषराव पाबळे, टी. एस. लोखंडे, जिजा वाघ, प्रदीप इंगळे, आदी मान्यवर उपस्थित होते.पतसंस्थेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि सर्व गुणवंत शिक्षकांना व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis