लातूर-औसा रोडवर एसटी आणि स्कूल बसची धडक; बस रिकामी असल्याने अनर्थ टळला
लातूर, 27 जुलै (हिं.स.)। लातूर-औसा रोडवर राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने स्कूल बसला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, निलंगा डेपोची एसटी बस लातूरहून निलं
अपघात


लातूर, 27 जुलै (हिं.स.)। लातूर-औसा रोडवर राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने स्कूल बसला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, निलंगा डेपोची एसटी बस लातूरहून निलंग्याकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कूल बससोबत अपघात झाला. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सुदैवाने, अपघातावेळी स्कूल बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र,स्कुल बसचालक आणि काही बस प्रवासी जखमी असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे. अधिक तपशील आणि अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande