रत्नागिरी : सावर्डे-डेरवण फाट्यावर कंटेनर-दुचाकी धडकेत शिक्षक गंभीर
रत्नागिरी, 27 जुलै (हिं.स.) । मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे-डेरवण फाटा (ता. चिपळूण) येथे कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार शंकर पाटील गंभीर जखमी झाले. ते सावर्डे भुवडवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. अपघातानं
सावर्डे येथील अपघात


रत्नागिरी, 27 जुलै (हिं.स.) । मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे-डेरवण फाटा (ता. चिपळूण) येथे कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार शंकर पाटील गंभीर जखमी झाले. ते सावर्डे भुवडवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.

अपघातानंतर त्यांना तातडीने डेरवण येथील रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

अपघाताची माहिती मिळताच सावर्डे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून अपघाताचे कारण शोधण्यास सुरुवात केली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, हा संपूर्ण अपघात परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला असून त्याच्या आधारे पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande