नाशिक-मुंबई महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच; दोन दिवसांत तिसरा अपघात
नाशिक, 27 जुलै (हिं.स.)। मुंबई महामार्गा लगतच्या भुजबळ फार्म परिसरात असलेल्या इंदिरानगर बोगद्याजवळ अपघातांचे सत्र कायम असून, गेल्या दोन दिवसांत तिसरा अपघात घडल्याने या मार्गावरील वाहतूक सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सकाळी साडेअकर
नाशिक-मुंबई महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच; दोन दिवसांत तिसरा अपघात


नाशिक, 27 जुलै (हिं.स.)। मुंबई महामार्गा लगतच्या भुजबळ फार्म परिसरात असलेल्या इंदिरानगर बोगद्याजवळ अपघातांचे सत्र कायम असून, गेल्या दोन दिवसांत तिसरा अपघात घडल्याने या मार्गावरील वाहतूक सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सकाळी साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास मुंबईहून धुळ्याकडे जाणार्या ट्रकची पिकअप आणि एका चारचाकी वाहनाशी धडक झाली.

या अपघातात चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रकचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.

दरम्यान, मुंबई महामार्गावरील इंदिरानगर बोगद्याजवळील भुजबळ फार्म परिसरात वारंवार अपघात होत असल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी चिंता व्यक्त केली आहे. या ठिकाणी वेगमर्यादेची प्रभावी अंमलबजावणी, इशारा फलकांची उभारणी, रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना तसेच वाहतूक पोलिसांची नियमित उपस्थिती वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे. नाशिकच्या भुजबळ फार्म परिसरात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असून, दोन दिवसांत तिसरा अपघात घडल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काल सकाळी साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास मुंबईहून धुळ्याकडे जाणारा ट्रक आणि एक पिकअप वाहन यांची धडक एका चारचाकी वाहनाला बसल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, ट्रकचालकाला चौकशीसाठी अंबड पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून, अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास सुरू आहे. भुजबळ फार्म परिसरात सलग अपघात घडत असल्याने या ठिकाणी वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande