वर्धा-बडनेरा रेल्वे मार्गाच्या प्रक्रियेला वेग
अमरावती, 27 जुलै (हिं.स.)बडनेरा रेल्वे या तिसरा व चौर्थ्या मार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग आला असून, अंजनगाव बारी, म्हसला, पार्डी व उदखेड येथील बाधित भूधारकांची माहिती तातडीने संकलित करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, अमरावती
वर्धा-बडनेरा रेल्वे मार्गाच्या प्रक्रियेला वेग


अमरावती, 27 जुलै (हिं.स.)बडनेरा रेल्वे या तिसरा व चौर्थ्या मार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग आला असून, अंजनगाव बारी, म्हसला, पार्डी व उदखेड येथील बाधित भूधारकांची माहिती तातडीने संकलित करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, अमरावती यांनी संबंधित तलाठ्यांना दिले आहेत.

नुकताच जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, रेल्वेच्या संयुक्त मोजणी अहवाल प्रक्रिये साठी संबंधित जमीनधारकांच्या आधारकार्डाच्या प्रती, मोबाईल क्रमांक आणि सध्याचा संपूर्ण पोस्टल पत्ता तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वे सुधारणा अधिनियम १९८९ व २००८ मधील तरतुदींनुसार वर्धा-बडनेरा तिसरा व चौथा मार्ग प्रकल्पासाठी अंजनगाव बारी, म्हसला, पार्डी (देवी) आणि उदखेड येथील खासगी जमिनींचे भूसंपादन प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले आहेत.

या अनुषंगाने उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे मोजणीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले असून, पुढील कार्यवाहीसाठी संयुक्त मोजणी आवश्यक आहे. प्रशासनाने संबंधित गावांतील तसेच गावाबाहेर वास्तव्यास असलेल्या सर्व बाधित भूधारकांची अद्ययावत माहिती तातडीने तलाठी कार्यालयामार्फत भूसंपादन कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर संयुक्त मोजणीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून भूसंपादनाची पुढील कार्यवाही सुरू होणार आहे. दरम्यान, या रेल्वे प्रकल्पामुळे परिसरातील रेल्वे वाहतूक अधिक सक्षम व गतिमान होण्यास मदत होणार असून, प्रकल्पासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.----------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande