काकाजी खंडेलवाल यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी : ॲड. आकाश फुंडकर
अकोला, 01 ऑगस्ट (हिं.स.)। समर्पण,जिव्हाळा,कठोर परिश्रम या त्रिसूत्रीच्या माध्यमातून स्व. काकाजी खंडेलवाल यांनी केलेले कार्य सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक प्रेरणास्रोत म्हणून प्रत्येकासाठी आदर्शवत आहे. त्यांच्या कार्यातून प्रत्येकाने प्रेरणा घ्याव
Photo


अकोला, 01 ऑगस्ट (हिं.स.)।

समर्पण,जिव्हाळा,कठोर परिश्रम या त्रिसूत्रीच्या माध्यमातून स्व. काकाजी खंडेलवाल यांनी केलेले कार्य सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक प्रेरणास्रोत म्हणून प्रत्येकासाठी आदर्शवत आहे. त्यांच्या कार्यातून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी आज येथे केले.

ते शंकरलाल खंडेलवाल कला,विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात स्व. शंकरलाल खंडेलवाल उपाख्य काकाजींची जयंती, तसेच लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त प्रेरणा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ॲड. फुंडकर बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष ताराताई हातवळणे होत्या. आमदार वसंत खंडेलवाल,जेष्ठ प्रचारक रविंद्र भुसारी,नरकेसरी प्रकाशनचे प्रबंध संचालक धनंजय बापट, शिक्षण प्रसारण मंडळाचे उपाध्यक्ष अरुण कुलकर्णी, प्राचार्य डॉ जगदीश साबू यांच्यासह मंडळाचे सदस्य आदी उपस्थित होते

यावेळी नरकेसरी प्रकाशन, नागपूर संस्थेला 'स्व. काकाजी स्मृती पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. तसेच प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला.

श्री. फुंडकर म्हणाले की,

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता सामाजिक जाणीव,अभ्यास व प्रेरणास्रोत जपणे गरजेचे आहेत. स्व. काकाजींचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande