दादा जे. पी. वासवानी यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त निर्वाण बिर्ला यांचे विशेष कीर्तन सादरीकरण
मुंबई, ३ ऑगस्ट (हिं.स.) : दादा जे. पी. वासवानी यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त साधू वासवानी मिशनतर्फे विशेष कीर्तन जॅमिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उद्योगपती आणि गायक निर्वाण बिर्ला यांनी आपल्या भावपूर्ण सादरीकरणातून उपस्थितांना
कीर्तन जॅमिंग


मुंबई, ३ ऑगस्ट (हिं.स.) : दादा जे. पी. वासवानी यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त साधू वासवानी मिशनतर्फे विशेष कीर्तन जॅमिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उद्योगपती आणि गायक निर्वाण बिर्ला यांनी आपल्या भावपूर्ण सादरीकरणातून उपस्थितांना भक्तिमय वातावरणाचा अनुभव दिला. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक कीर्तनाने झाली. त्यानंतर विविध भक्तिगीते आणि नामस्मरणाच्या सुरांनी सभागृहात प्रसन्न वातावरण निर्माण झाले. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण या संगीतमय सोहळ्यात सहभागी झाले. संगीताच्या माध्यमातून दादा जे. पी. वासवानी यांनी दिलेला प्रेम, करुणा आणि क्षमाशीलतेचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी बोलताना निर्वाण बिर्ला म्हणाले, साधू वासवानी मिशनसोबतचे हे माझे तिसरे कीर्तन आहे. यंदा दादा जे. पी. वासवानी यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचा भाग होता आल्याचा आनंद अधिक आहे. दादा आणि दीदी कृष्णा यांनी उभी केलेली ही परंपरा प्रत्येकाला स्वतःशी आणि ईश्वराशी जोडण्याची संधी देते. येथे येणाऱ्या प्रत्येकाने काही क्षण संगीतासोबत घालवावेत आणि त्या माध्यमातून मनःशांतीचा अनुभव घ्यावा, हीच माझी इच्छा आहे. त्या काही क्षणांत जरी कोणाला अंतर्मनातील आनंद मिळाला, तरी माझ्यासाठी तेच या कीर्तनाचं यश आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी पारंपरिक लंगर प्रसादाचे आयोजन करण्यात आले. भक्ती, संगीत आणि सामूहिक सहभागाचा सुंदर मिलाफ घडवणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande