महाकाल मंदिर रस्ता व घाटाचे काम लवकरच – आमदार सावरकर
अकोला, ३ ऑगस्ट (हिं.स.) : शिवभक्तांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, अशा स्पष्ट सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी दिल्या. यावेळी महापौर शारदा खेडकर, स्थायी समिती सभापती विजय अग
Photo


अकोला, ३ ऑगस्ट (हिं.स.) : शिवभक्तांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, अशा स्पष्ट सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी दिल्या. यावेळी महापौर शारदा खेडकर, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, महानगराध्यक्ष जयंत मसने, उपमहापौर अमोल गोगे यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, मनपा, एनएचएआय , सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आमदार रणधीर सावरकर आणि खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या १ कोटी ४१ लाख रुपयांच्या निधीतून गांधीग्राम येथील महाकाल मंदिरापर्यंत जाणारा रस्ता आणि घाटाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सावरकर यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.यावेळी बोलताना आमदार सावरकर म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून शिवभक्तांच्या सोयीसाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. पालखी सोहळा संपल्यानंतर आता गणेशोत्सवाचा कालावधी सुरू होत असल्याने विसर्जन मार्ग, शहरातील गणेश मंडळांपर्यंत जाणारे रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य सुविधा वेळेत पूर्ण कराव्यात.तसेच सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून कामांची गुणवत्ता राखत नियोजित वेळेत विकासकामे पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande