
अकोला, 01 ऑगस्ट (हिं.स.)।
संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने महापौर शारदा खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या उपस्थितीत स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्याव्दारे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विशेष बैठक घेण्यात आली होती.
त्या अनुषंगाने अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारा शहरात नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास नागरिकांची दुर्दशा टाळण्याकरिता व परिस्थितीवर तात्काळ नियोजन व उपाययोजना करण्याकरिता पुर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण क्षेत्रीय कार्यालय (झोन कार्यालय) निहाय चार पथके कार्यान्वीत करण्यात आले आहे.
झोन निहाय पथकांच्या अधिकारी/कर्मचारी यांचे नांव आणि मोबाईल नंबर असलेली यादी अकोला महानगरपालिकेच्या amcakola.in या संकेत स्थळ (Web Site) वर किंवा (https://drive.google.com/file/d/1MmWnvDj_kWtLcOUSnx3WaolGi5Q_87fe/view?usp=drive_link) या लिंकवर क्लीक करून उपलब्ध करून घ्यावी तसेच नागरिकांना नैसर्गिक आपत्ती काळात अग्निशमन विभागाच्या 2434460 किंवा मनपा टोल फ्री क्रं. 18002335733 किंवा 2434412 या नंबरांवर संपर्क साधण्याचे आवाहन महापौर शारदा खेडकर, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, उपमहापौर अमोल गोगे यांच्याव्दारे करण्यात आले आहे. तसेच या नंबरांवर काही कारणास्तव फोन नाही लागल्यास महापौर शारदा खेडकर, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, उपमहापौर अमोल गोगे, सभागृहनेता पवन महल्ले, चारही झोनचे सभापती यांचेशी संपर्क साधावे असे आवाहन सभापती विजय अग्रवाल यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे